नवी मुंबईत लॉजवर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत लॉजवर छापा
नवी मुंबईत लॉजवर छापा

नवी मुंबईत लॉजवर छापा

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एपीएमसीतील एस. के. लॉजिंग/एम. जी. लॉजिंग ॲन्ड बोर्डिंगवर छापा मारला. त्या ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी आणण्यात आलेल्या पाच महिलांची सुटका करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी लॉजचा मॅनेजर व दोन दलाल या तिघांविरोधात पिटा ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
ही कारवाई गुरुवारी (ता. १८) करण्यात आली.

एपीएमसीतील एस. के. लॉजिंग/एम. जी. लॉजिंग ॲन्ड बोर्डिंगमध्ये अल्पवयीन मुली व महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक पराग सोनावणे व त्यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी बनावट ग्राहकाला लॉजवर पाठवले होते. या वेळी लॉजच्या मॅनेजरने दोन दलालांना संपर्क साधून महिलांना वेश्यागमनासाठी बोलावले. बनावट ग्राहकाने वेश्यागमनासाठी एका मुलीची निवड केल्यानंतर मॅनेजरने बनावट ग्राहकाकडून ३५०० रुपये स्वीकारून त्याला महिलेसोबत लॉजमधील रूममध्ये पाठवले. बनावट ग्राहकाने दिलेल्या इशाऱ्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने लॉजवर छापा मारला. या वेळी पोलिसांच्या पथकाने लॉजची तपासणी केली असता, त्या ठिकाणी वेश्या व्यसायासाठी बोलावण्यात आलेल्या सात महिला व तरुणी आढळून आल्या. त्यामुळे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने लॉजचा मॅनेजर विरेंद्र यादव (वय ३२) तसेच मिथिलेश प्रसाद साव (वय ३१) व भागीप्रसाद यादव (५०) या दोन दलालांना अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93908 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..