गुंड इक्बाल कासकर जे. जे. रुग्णालयात दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुंड इक्बाल कासकर जे. जे. रुग्णालयात दाखल
गुंड इक्बाल कासकर जे. जे. रुग्णालयात दाखल

गुंड इक्बाल कासकर जे. जे. रुग्णालयात दाखल

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : भारताचा मोस्ट वाँटेड असलेला फरारी आरोपी दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याने न्यायालयीन कोठडीत असताना छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे त्याला मुंबईच्या जे. जे. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
नवी मुंबई येथील तळोजा येथील तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या इक्बालने शनिवारी रात्री छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर तुरुंग प्रशासनाने इक्बालला जे. जे. रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर आहे. इक्बालला ईडीने आर्थिक अफरातफर प्रकरणात अटक केली आहे. याआधी ठाणे पोलिसांच्या एका टीमने प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वात त्याला सप्टेंबर २०१७ मध्ये अटक केली होती. त्याच्यावर एका विकसकाकडे खंडणीची मागणी केल्याचा आरोप होता. नंतर झालेल्या तपासात त्याच्यावर तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये खंडणीची मागणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला. तळोजा तुरुंगात असलेल्या इक्बाल याला ईडीने आर्थिक अफरातफर प्रकरणात जून २०२१ मध्ये ताब्यात घेतले.
...
आतापर्यंतचा तपास
१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम आणि इतरांविरुद्ध एनआयएने फेब्रुवारी २०२२ नोंदवला होता. ईडीने मुंबईतील दाऊद इब्राहिमशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले होते. यामध्ये इक्बाल कासकरसह अनेक नातेवाईक आणि जवळच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, इक्बाल दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांचा वापर करून खंडण्या उकळायचा. तो धमक्या देणे, खंडणी वसूल करणे अशा कृत्यांमध्ये गुंतल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93910 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..