राजस्थान सरकारच्या विरोधात आरपीआयचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजस्थान सरकारच्या विरोधात आरपीआयचे आंदोलन
राजस्थान सरकारच्या विरोधात आरपीआयचे आंदोलन

राजस्थान सरकारच्या विरोधात आरपीआयचे आंदोलन

sakal_logo
By

चेंबूर, ता. २१ (बातमीदार) ः राजस्थानमध्‍ये शिक्षकांच्‍या माठातील पाणी प्यायल्याच्या रागाने शिक्षकाने एका दलित विद्यार्थ्याला मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोपीला पाठीशी घालणाऱ्या जातीयवादी सरकारच्या निषेधार्थ आरपीआयच्या वतीने चेंबूर नाक्याजवळ निदर्शने करण्यात आली. राजस्थान राज्यातील जालौर विधानसभा मतदारसंघामधील सुराणा गावात सरस्वती विद्यालयात शिकणारा दलित मुलगा इंद्र कुमारने शिक्षकांच्या माठातील पाणी पायल्याने शिक्षकाने मारहाण केली होती. त्यात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. आरोपीला राजस्थानमधील जातीयवादी सरकार पाठीशी घालत असल्याने या सरकारचा निषेध करण्याकरिता आरपीआयच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘रास्ता रोको’ करण्याचा प्रयत्‍न केला असता पोलिसांनी त्यांना अडविले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93915 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..