एसटी बँकेची निवडणूक रखडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी बँकेची निवडणूक रखडली
एसटी बँकेची निवडणूक रखडली

एसटी बँकेची निवडणूक रखडली

sakal_logo
By

एसटी बँकेची निवडणूक रखडली
निवडणूक प्राधिकरणाचा सहकार विभागात प्रस्ताव धूळ खात
निवडणूक पुढे ढकलण्यासंदर्भात केली होती शिफारस

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने एसटीच्या बँकेची निवडणूक घोषित केली; मात्र थकबाकीदारांमुळे बँकेच्या मतदारांची संख्या घटल्याने अखेर निवडणूक प्राधिकरणाने एसटी बँकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सहकार विभागाला प्रस्ताव पाठवला होता. यावर अद्याप कोणताही निर्णय होऊ शकला नसल्याने एसटी बँकेच्या निवडणुका गेल्या वर्षीपासून रखडल्या आहेत. हळूहळू एसटी बँकेच्या थकबाकीदारांना हप्ते भरण्याची संधी आणि त्यामध्ये सूट देऊन मतदारांची संख्या वाढवण्याचा एसटी बँकेचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
संपामुळे ५९ टक्के सभासद असलेले एसटी कर्मचारी थकबाकीदार झाले आहेत. त्यामुळे या थकबाकीदारांना बँकेच्या निवडणुकीत मतदान करता येईल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एसटी बँक प्रशासन आणि निवडणूक प्राधिकरणाकडून जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुंबईला पत्र पाठवून सर्व सभासदांना एसटी बँकेच्या संचालक पदाच्या मतदानापासून वंचित न ठेण्यासाठी पत्र पाठवले होते; मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने बँकेच्या ५९ टक्के सभासदांच्या मतदानाच्या अधिकाराचे भविष्य अंधारात आहे.
एसटी बँकेच्या ५० शाखा मिळून सुमारे ७० हजारपेक्षा जास्त सभासद आहेत. संपानंतर फक्त २५ ते ३० हजार सभासद मतदान करण्यास पात्र आहेत. त्यामुळे सर्वाधिक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची भीती असल्याचे एसटी बँकेने निवडणूक प्राधिकरणाच्या लक्षात आणून दिले आहे. नुकतेच निवडणूक प्राधिकरणाला एसटी बँक प्रशासनाने बँकेच्या परिस्थितीचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे निवडणूक प्राधिकरणाने राज्याच्या सहकार विभागाला निवडणुका पुढे ढकलण्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावामुळे एसटीच्या निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93919 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..