गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने मारहाण
गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने मारहाण

गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने मारहाण

sakal_logo
By

भिवंडी, ता. २१ (बातमीदार) : भिवंडीत केंद्रीय गुप्त वार्ता विभागाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिकाऱ्याने गणेशोत्सवाची वर्गणी देण्यास नकार दिल्याने गणेश मंडळाच्या सदस्यांनी मारहाण केली होती.

सुखसागर कुंदनसिंग रावत हे केंद्रीय गुप्तवार्ता विभागात कार्यरत आहेत. टेमघर गावात हरिहरेश्वर सोसायटीत ते राहतात. साईश्रद्धा मित्र मंडळाचे लोक त्यांच्याकडे गणेशोत्सवाची वर्गणी मागण्यासाठी आले होते, पण रावत यांनी वर्गणी देण्यास नकार दिला. याचा राग येऊन मंडळाच्या लोकांनी रावत यांना ठोसे-बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यात रावत जखमी झाले. त्यानंतर त्यांनी शांतिनगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी विश्वनाथ पाटील, प्रतीक बोरसे, सुनील राहुलवर, जातिशर फुलोरे आणि सागर पाटील यांना अटक केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93927 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..