न्यायालयाच्या आवारात आरोपीचा वाढदिवस साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यायालयाच्या आवारात आरोपीचा वाढदिवस साजरा
न्यायालयाच्या आवारात आरोपीचा वाढदिवस साजरा

न्यायालयाच्या आवारात आरोपीचा वाढदिवस साजरा

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २१ (वार्ताहर) ः हत्येच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीने पोलिस व्हॅनमध्ये बसून वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कल्याण न्यायालयाच्या आवारात शनिवारी (ता. २०) घडली. रोशन झा असे या आरोपीचे नाव आहे.

रोशन झा याला हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शनिवारी त्याला कल्याणच्या न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आले होते. त्याच दिवशी त्याचा वाढदिवस असल्याने त्याच्या समर्थकांनी त्याचा वाढदिवस न्यायालयाच्या आवारातच साजरा केला. या वेळी रोशन झा पोलिस व्हॅनमध्ये बसलेला होता. तेव्हा व्हॅनच्या खिडकीसमोर केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला गेला. व्हॅनमध्ये बसूनच त्याने केक कापला. न्यायालयाच्या आवारात असूनही पोलिसांनी केक कापायला मज्जाव का केला नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93928 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..