सर्वाधिक अपघात ग्रामीण भागातील रस्त्यांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वाधिक अपघात ग्रामीण भागातील रस्त्यांवर
सर्वाधिक अपघात ग्रामीण भागातील रस्त्यांवर

सर्वाधिक अपघात ग्रामीण भागातील रस्त्यांवर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : राज्यात वेगवान रस्त्यांच्या उभारणीची टक्केवारी ज्या वेगाने वाढत आहे, त्याच वेगाने अपघात आणि अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. महामार्ग पोलिसांनी गेल्या वर्षी विविध रस्त्यांवरील अपघातांचे सर्वेक्षण केले. यात धक्कादायक माहिती पुढे आली असून, सर्वाधिक अपघात आणि मृत्यूची संख्या ही ग्रामीण भागातील स्थानिक रस्त्यांवरील दिसून आली आहे. एकूण रस्त्यांच्या प्रकारातील अपघातांची संख्या गेल्या वर्षभरात २९ हजार ४९३ वर पोहचली आहे; तर १३ हजार ५२८ नागरिकांचा वाहन अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे.

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपेक्षाही ग्रामीण भागातील स्थानिक रस्त्यांवर सर्वाधिक अपघात झाल्याचे महामार्ग पोलिसांच्या सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत तथा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या तालुका, जिल्ह्याच्या पातळीवरील रस्त्यांवर प्राणाघातक अपघात आणि मृत्यूच्या संख्या सर्वाधिक आढळून आली आहे. या रस्त्यांवर गेल्या वर्षभरात १५,६६४ अपघात झाले असून ६०३७ मृत्यू झाले आहेत. ५७२४ प्राणघातक अपघात झाले असल्याची नोंद महामार्ग पोलिसांनी केली आहे; तर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या वर्षी ७३०१ अपघात झाले असून ३६०७ प्राणघातक अपघात झाले आहेत. ३९९२ नागरिकांचा वाहन अपघातांमध्ये मृत्यू झाल्याचे महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीने दिसून येते.
----------
गेल्या वर्षीच्या अपघाताची रस्तानिहाय आकडेवारी
रस्त्याचा प्रकार - प्राणघातक अपघात - मृत्यू - एकूण अपघात
एक्स्प्रेस वे - ७१ - ८८ - २००
नॅशनल हायवे - ३६०७ - ३९९२ - ७३०१
स्टेट हायवे - ३१५१ - ३४११ - ६३२८
इतर रस्ते - ५७२४ - ६०३७ - १५६६४
एकूण - १२५५३ - १३५२८ - २९४९३

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93930 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..