कर्जतच्या जलाशयात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जतच्या जलाशयात वाढ
कर्जतच्या जलाशयात वाढ

कर्जतच्या जलाशयात वाढ

sakal_logo
By

कर्जत, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यात जलसंधारण लघु पाटबंधारे विभागाचे एकूण दहा पाझर तलाव आहेत. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे या धरणांच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. दहापैकी नऊ तलाव १०० टक्के भरले असून ओसंडून वाहत आहेत. मात्र, आर्डे तलाव फक्त ८० टक्के भरला आहे. पाऊस अजूनही सुरू असल्याने तेही लवकरच भरण्याची शक्यता आहे. या तुडुंब भरलेल्या जलसाठ्यांमुळे तालुक्यातील बहुतांश गावांच्या पिण्याच्या पाण्याची आणि शेतीची गरज भागणार आहे.
कर्जत तालुक्यात खांडस, कशेळे, आंबिवली, जामरूख, डोंगरपाडा, खांडपे, अंभेर पाडा, बलीवरे, वरई, आर्डे असे दहा पाझर तलाव आहेत. दरवर्षी हे पाझर तलाव उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यात तळ गाठतात. त्यामुळे या तलावांच्या पाण्यावर विसंबून असलेल्या पाणी योजना बंद पडतात. परिणामी, तेथील ग्रामस्थांना पाणी टंचाईची झळ बसून महिलांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागते. मात्र, यंदा दहापैकी नऊ पाझर तलाव १०० टक्के भरल्याने महिलांची या समस्येतून काही अंशी सुटका होणार आहे. केवळ आर्डे तलाव ८० टक्के भरले आहे. तेही लवकरच भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१०० टक्के भरलेले पाझर तलाव आणि त्यांचे क्षेत्रफळ

जामरूख - हेक्टर ९.३०
वरई - हेक्टर१३.१३
बलीवरे - हेक्टर १०.८९
पाथरज डोंगरपाडा - हेक्टर ५.६०
खांडस - हेक्टर ५.६८
कशेळे जलक्षेत्र ( हेक्टर ४.५८
खांडपे - हेक्टर१७.००
अंभेर पाडा - हेक्टर ८.००
आंबिवली - हेक्टर ९.३०
--------------------------
आर्डे - हेक्टर १६.०० (८० %)
--------------------------

पावसाळ्यापूर्वी सर्व पाझर तलावांच्या जलसाठ्यात कमालीची घट झाली होती. मात्र, आता या जलाशयांमध्ये मुबलक पाणी साठा जमा झाला आहे. हे सर्व तलाव सुस्थितीत आहेत .
- सुरेश इंगळे, जलसंधारण लघु पाटबंधारे, कर्जत

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93934 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..