पान ३ पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३ पट्टा
पान ३ पट्टा

पान ३ पट्टा

sakal_logo
By

गणेशोत्सवात महामार्गांवर आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करा
कामोठे (बातमीदार) : गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या वर्दळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने अपघाताची शक्यता बळावते. त्यामुळे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून जाणाऱ्या महामार्गावर आपत्कालीन आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी पनवेलचे सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांनी रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे केली आहे. गणेशोत्सवात मुंबई व उपनगरातील हजारो चाकरमानी कोकणात जात असतात. या कालावधीत सायन-पनवेल, ठाणे-बेलापूर, मुंब्रा-पनवेल महामार्गावर वाहनांच्या वर्दळीत वाढ होते. तसेच पावसामुळे महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक झाला आहे.

़़़़़नवीन पनवेलमध्ये मोफत नेत्रचिकित्सा शिबीर
कामोठे (बातमीदार) : प्रकाश म्हात्रे मित्र मंडळ, लिंगेश्वर महादेव मंदिर व आर. आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्यातर्फे नवीन पनवेल सेक्टर ५ मध्ये लिंगेश्वर महादेव मंदिरात मोफत नेत्रचिकित्सा व चष्मेवाटप शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे शेकाप जिल्हा सहचिटणीस प्रकाश म्हात्रे यांनी उद्‍घाटन केले. माजी नगरसेविका प्रज्योती म्हात्रे, माजी नगरसेवक गोपाळ भगत, बबन विश्वकर्मा, शरद घुले, प्रणय म्हात्रे, नरेश पेडणेकर, हरिश्चंद्र गायकवाड या वेळी उपस्थित होते. नवीन पनवेल सेक्टर ५, ६, ७ मधील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
----
कळंबोली वसाहतीमधील रस्त्यांची दुरुस्ती
नवीन पनवेल (वार्ताहर) ः कळंबोली वसाहतीमध्ये पाईपलाईनसाठी खोदलेले चर व पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली होती. या ठिकाणी वाहन चालवणे जिकिरीचे बनले होते. परिणामी, वाहनचालकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच किरकोळ अपघात होऊन अनेकदा वादावादीचे प्रसंगदेखील उद्‍भवल्याने ‘सकाळ’ने अनेक वेळा याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर रस्त्यावरील हे खड्डे पेव्हर ब्लॉकने बुजवण्याचे काम पालिकेने हाती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
़़़़़
नेरूळमध्ये नागरी सेवांकरिता राखीव भूखंड
नेरूळ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या प्रस्तावित शहर नियोजनाच्या २०२२ च्या आराखड्यात नेरूळ सेक्टर २ व ४ करिता खेळांचे संकुल, नागरिक समाज मंदिर आणि अग्निशमन स्टेशन जागा राखीव ठेवली असून लवकरच या कामांना गती येणार आहे. नेरूळमधील सेक्टर २ व ४ मधील नागरिकांसाठी ही सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी भाजप नवी मुंबई युवती मोर्चा अध्यक्ष सुहासिनी नायडू या मागील सहा वर्षांपासून पाठपुरावा करत होत्या. नागरी सेवा विकासकामांना गती मिळावी, यासाठी स्थानिक बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई मनपा प्रशासनाकडे विशेष प्रयत्न केले होते.
़़़़़़़़
बॅडमिंटन स्पर्धेत उरणच्या स्पर्धकांचे यश
उरण (वार्ताहर) ः महाराष्ट्र बॅडमिटंन असोशिएशनतर्फे वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट कॉप्लेक्समध्ये झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत उरणच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले आहे. या स्पर्धेत जसखार येथील सुदीप पाटील, जेएनपीटी येथील शैलेश राकेश सिंग यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे; तर नवघर येथील विजय राजाराम भोईर यांनी तृतीय क्रमांक पटकावत उरणचा नावलौकिक वाढवला आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या या स्पर्धेत २४ संघांसह ३०० स्पर्धक सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93936 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..