सणासुदीत कांदा, लसणाच्या दरांत घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सणासुदीत कांदा, लसणाच्या दरांत घसरण
सणासुदीत कांदा, लसणाच्या दरांत घसरण

सणासुदीत कांदा, लसणाच्या दरांत घसरण

sakal_logo
By

वाशी, ता. २२ (बातमीदार) ः ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा संपला तरी कांदा अजूनही कवडीमोल दरानेच विकला जात आहे. एपीएमसीच्या घाऊक बाजारात कांद्याला किलोला ११ ते १२ रुपयांचा दर मिळत असून लसूण दहा रुपये, बटाटा १७ रुपये किलोने विकला जात आहे. एकीकडे सणासुदीत दरांमधील घसरणीमुळे नक्कीच दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे दैंनदिन वापरातील तेल आणि भाज्यांचे दर मात्र चढेच असल्याने गृहिणींची तारेवरची कसरत सुरूच आहे.
केंद्र सरकारचे कांदा निर्यातीसाठी निश्चित धोरण नाही. कधीही निर्यात बंद आणि कधीही चालू केली जात असल्यामुळे कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या दरांवर देखील झाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून कांद्याचे दर स्थिरच आहेत. जून महिन्यातील काही दिवस सोडले तर कांद्याचे दर दहा ते बारा रुपयांच्या आसपासच आहेत. सध्या बाजारात पुणे व नाशिक जिल्ह्यामधून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मार्केटमध्ये दररोज ८० ते ८५ गाड्यांची आवक होत आहे. त्यामुळे भाववाढ होईल, या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवण करणाऱ्या शेतकऱ्याला यंदा कांदा रडविणार, अशी शक्यता आहे.

लसूण, बटाट्याची आवक वाढली
लसूण हे पीक खर्चिक आहे. त्यामुळे त्याचा दर शंभर रुपये किलोच्या आसपास असतो. मात्र, आता एपीएमसीच्या घाऊक बाजारात लसूण १० ते ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. सध्या इंदोर व गुजरातमधून मोठ्या प्रमाणात लसणाची बाजारात आवक होत आहे; तर गुजरात व उत्तर प्रदेशमधून ३५ ते ४० गाड्या बटाट्याची आवक होत असल्याने दर १५ ते १७ रुपयांवर स्थिर आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93938 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..