गावदेवी मैदानाबाहेर कचऱ्याचे ढीग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावदेवी मैदानाबाहेर कचऱ्याचे ढीग
गावदेवी मैदानाबाहेर कचऱ्याचे ढीग

गावदेवी मैदानाबाहेर कचऱ्याचे ढीग

sakal_logo
By

नेरूळ, ता. २२ (बातमीदार) ः नेरूळ विभागातील कुकशेत गाव, सेक्टर १४, गावदेवी मैदानाबाहेर उघड्या जागेवर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी वृक्ष छाटणी केलेल्या झाडाच्या फांद्यादेखील पदपथांवरच टाकल्या गेल्या असल्यामुळे परिसराला बकाल स्वरूप आले आहे.
कचराकुंडी मुक्त शहर करण्याच्या अनुषंगाने गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या माध्यमातून शहरातील कचराकुंड्या टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येत आहे. कचरा संकलनासाठी महापालिकेच्या माध्यमातून घंटागाडी वापरण्यात येत आहेत; परंतु कुकशेत गावातील उद्यानाबाहेरच पदपथावरच नागरिकांकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून मैदानात येणाऱ्यांना कचऱ्यातून वाट काढण्याची वेळ आली आहे. तसेच पावसाळ्यात उघड्यावरच पडलेला कचरा कुजल्यामुळे सर्वत्र दुर्गंधीदेखील पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पदपथावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93939 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..