एपीएमसीत बेकायदा वाहनतळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एपीएमसीत बेकायदा वाहनतळ
एपीएमसीत बेकायदा वाहनतळ

एपीएमसीत बेकायदा वाहनतळ

sakal_logo
By

वाशी, ता. २२ (बातमीदार) ः नवी मुंबईत पार्किंग व्यवस्थेअभावी शहरातील वर्दळीचे रस्ते वाहनतळ बनले आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या एपीएमसी मार्केटला देखील या समस्येने ग्रासले असून रस्त्यालगत उभ्या केल्या जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
शहरात वाहन पार्किंगला दुय्यम स्थान मिळत आहे. त्याचाच परिणाम म्हणून एपीएमसी आवारातील रस्त्यांवर बेकायदा पार्किंगचे प्रमाण सध्या वाढले आहे. या परिसरातील मोकळ्या जागा तसेच पदपथांवरच वाहने उभी केली आहेत. मात्र या पार्किंगवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. मार्केट परिसरातील सेवा रस्ते सध्या बेकायदा वाहनतळ बनले आहे. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून, रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका अधिक असल्याने रस्त्यांवरील उभी केलेली वाहने हटविण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात वाहतूक पोलिस उपआयुक्त पुरुषोत्तम कराड यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93940 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..