ग्राहकांना नियमित वेळेत मिळतील वीज देयके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राहकांना नियमित वेळेत मिळतील वीज देयके
ग्राहकांना नियमित वेळेत मिळतील वीज देयके

ग्राहकांना नियमित वेळेत मिळतील वीज देयके

sakal_logo
By

जव्हार, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यातील सर्व वीजग्राहकांना देयके ही सवलत तारखेच्या अगोदर पोहोचवण्यात येणार आहेत, महावितरणचे उपकार्यकारी उप अभियंता विवेक तळणीकर सांगितले. वीज देयके उशिरा मिळत असल्याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.
शहरातील ग्राहकांना वीज बिल भरण्याच्या सवलत तारखेला वीज बिल मिळत असल्याने ग्राहकांना अतिरिक्त भुर्दंड बसत होता. त्यामुळे वीज बिले सवलत तारखेपूर्वी देण्यात यावी, अशी मागणी ग्राहकांतून होत होती. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महावितरणने त्याची दखल घेतली आहे. तसेच महावितरणने ग्राहकांना आवाहन केले की, ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक महावितरणच्या वेब साईटवर रजिस्टर केल्यास आपणास वीज देयकाबाबत पूर्वा कल्पना मिळू शकेल व ग्राहकांना सवलतीच्या मुदतीत ऑनलाईन बिल भरता येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93944 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..