मुलुंडमध्ये कृष्णरंग कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये कृष्णरंग कार्यक्रम
मुलुंडमध्ये कृष्णरंग कार्यक्रम

मुलुंडमध्ये कृष्णरंग कार्यक्रम

sakal_logo
By

मुलुंड, ता. २२ (बातमीदार) ः मुलुंड सार्वजनिक उत्सव विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र राहटे आणि सचिव विनायक सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त स्वरगंध निर्मित ‘कृष्णरंग’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संगीतमय कार्यक्रमामध्ये श्रीरंग भावे, दत्ता मेस्त्री, प्रीती निमकर, स्मूगधा माळी, मयुरेश साने आदी गायक कलाकारांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले. ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी मुलुंड पश्चिमेतील महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी केळकर रिसर्च सेंटरचे डायरेक्टर आणि प्राध्यापक डॉ. सिद्धिविनायक बर्वे आणि सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र सेवा संघाचे विश्वस्त रमेश धामणकर यांचा खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93950 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..