नवरात्रीत किंजल दवे बोरीवलीत थिरकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रीत किंजल दवे बोरीवलीत थिरकणार
नवरात्रीत किंजल दवे बोरीवलीत थिरकणार

नवरात्रीत किंजल दवे बोरीवलीत थिरकणार

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ ः बोरिवलीच्या दुर्गादेवी नवरात्र उत्सव समितीने गुजरातची दांडिया क्वीन किंजल दवे हिच्यासोबत मुंबईकरांना थिरकण्यासाठी नऊ दिवसांच्या दांडिया नाईट्स आयोजित केल्या आहेत. बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांच्या नेतृत्वाखाली होणारा हा उत्सव मुंबईतील सर्वात मोठा असल्याचा दावा केला जात आहे. किंजल दवे तिच्या पारंपरिक आणि आधुनिक बीट्सच्या फ्यूजनसह प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल, अशी ग्वाही राणे यांनी उत्सवाची घोषणा करताना दिली. हा सण सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणतो आणि प्रत्येकाला देवीचे आशीर्वाद व आनंद मिळवून देतो. मुंबईत गरबानृत्य करण्याची मी नेहमीच वाट पाहात असते, आताही आम्ही बोरिवलीचा उत्सव संस्मरणीय करू, असेही किंजल दवे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93952 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..