ऑल इंडिया पोस्टल ॲण्ड आरएमएस पेन्शनर्स असोसिएशनचे अधिवेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑल इंडिया पोस्टल ॲण्ड आरएमएस पेन्शनर्स असोसिएशनचे अधिवेशन
ऑल इंडिया पोस्टल ॲण्ड आरएमएस पेन्शनर्स असोसिएशनचे अधिवेशन

ऑल इंडिया पोस्टल ॲण्ड आरएमएस पेन्शनर्स असोसिएशनचे अधिवेशन

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २२ (बातमीदार) ः ऑल इंडिया पोस्टल ॲण्ड आरएमएस पेन्शनर्स असोसिएशन या संघटनेचे द्वितीय द्वैवार्षिक अधिवेशन दादर येथील संत सेवा महाराज सभागृह येथे नुकतेच पार पडले. या अधिवेशनास शेकडो सभासद उपस्थित होते. या अधिवेशनाचे उद्‌घाटन कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. के. रहाटे, महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी मंगेश परब, मुंबई प्रदेश सेक्रेटरी शरद पवार, प्रादेशिक उपाध्यक्ष सी. बी. सुर्वे आदी उपस्थित होते. अधिवेशनात पेन्शनच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर यांनी आपल्या भाषणात कामगार कायदे, निवृत्तीच्या अपेक्षा, सरकारी धोरणे, देशाची वर्तमान आर्थिक परिस्थिती या संदर्भात आपले विचार मांडले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93953 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..