मुलाची टेरेसवरून उडी मारून आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलाची टेरेसवरून उडी मारून आत्महत्या
मुलाची टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

मुलाची टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २२ (बातमीदार) : वसईत तरुणाने राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजता घडली आहे. आनंद के प्रसाद असे या तरुणाचे नाव असून तो आयटीचा विद्यार्थी होता.
वसई पश्चिमेच्या वसंत नगरी परिसरातील सेक्टर २ मध्ये ही घटना घडली आहे. आनंद हा सकाळी ७ वाजता क्लासला जाण्यासाठी घरातून निघाला होता, मात्र घरातून बाहेर पडल्यावर तो टेरेसवर गेला आणि टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे, पण त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93962 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..