भांडुप परिसरातील खड्डे बुजवायला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भांडुप परिसरातील खड्डे बुजवायला सुरुवात
भांडुप परिसरातील खड्डे बुजवायला सुरुवात

भांडुप परिसरातील खड्डे बुजवायला सुरुवात

sakal_logo
By

भांडुप, ता. २२ (बातमीदार) ः भांडुप परिसरातील खड्डे बुजवण्यासाठी अखेर कामाला सुरुवात झालेली आहे. महापालिकेतर्फे एलबीएस मार्गावरील मोठे खड्डे भरण्याचे काम चालू झाले आहे. यामुळे वाहनचालक समाधान व्यक्त करत आहेत. एलबीएस मार्गावर गांधीनगर सिग्नल परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत होते. हा रस्ता नेहमी वर्दळीचा असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. वाहनचालकांचा सोबत नागरिकही हैराण झाले होते. ड्रीम्स मॉलसमोरील खड्डे भरण्यात आले असून येत्या काही दिवसांत इतर खड्डे भरण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93968 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..