अर्नाळा किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्नाळा किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम
अर्नाळा किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम

अर्नाळा किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम

sakal_logo
By

विरार, ता. २२ (बातमीदार) : राष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्त अर्नाळा ग्रामपंचायत, अर्नाळा सोशल वर्क वेल्फेयर असोसिएशन आणि आम्ही जागृत बंदरपाडाकर यांच्या संयुक्त विद्यमाने अर्नाळा येथील समुद्र किनाऱ्यावर स्वछता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतून पाच ट्रॅक्टर एवढा कचरा जमा करण्यात आला. यामध्ये भारतीय तटरक्षकचे बी. के. सिंग, नेहा बारंगे, जे. जे. पाटील, सरपंच हेमलता बाळशी, उपसरपंच महेंद्र पाटील, अर्नाळा सोशल वर्क वेल्फेयर असोसिएशनचे सदस्य, मी जागृत बंदरपाडेकर ग्रुपच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या मोहिमेदरम्यान डॉ. गिरीजा बेहेरे, नेटफिश राज्य समन्वयक आणि प्रदीप सालियन यांनी प्लास्टिकविषयी जनजागृती केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93974 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..