खड्ड्यांमुळे आजारांमध्ये वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्ड्यांमुळे आजारांमध्ये वाढ
खड्ड्यांमुळे आजारांमध्ये वाढ

खड्ड्यांमुळे आजारांमध्ये वाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : या वर्षी झालेला जोरदार पाऊस आणि मुंबईतील रस्त्यांची झालेली चाळण यामुळे खड्ड्यांमधून प्रवास करणे मुंबईकरांसाठी अधिक आव्हानात्मक झाले आहे. रोजच्या प्रवासामध्ये खड्ड्यांमुळे उद्‍भवणाऱ्या पाठ, कंबर आणि मानेच्या विविध आजारांचे प्रमाण वाढत असून यामध्ये प्रामुख्याने तरुणांना सर्वाधिक त्रास झाल्याचे आढळले आहे.
मागील महिनाभरात खड्ड्यांमधून वाचण्यासाठीचे प्रयत्न करताना बाईकवरून पडल्याने अनेक अपघात झाले आहेत. ठाण्यात अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईमध्ये पश्चिम द्रुतगती मार्गावर एका जोडप्याचा मृत्यू खड्ड्यांमुळे झाला आहे.
खड्ड्यांमधून प्रवास करताना विशेषत: पाठीचे आणि कंबरेचे आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. प्रवास करताना सीटबेल्टचा वापर करणे फायदेशीर ठरेल. सातत्याने खड्ड्यातून गाडी चालवल्यावर पाठ, मान आणि कमरेवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे ‘स्लीप डिस्क’चा त्रास उद्‍भवू शकतो.

दुचाकीस्‍वारांमध्‍ये समस्‍या अधिक
अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील सल्लागार ऑर्थोपेडिक आणि स्पाईन सर्जन डॉ. ओम पाटील सांगतात, की जेवढ्या वेगात एखादा चालक खड्ड्यातून जातो तेवढ्या जोरात हिसका बसतो. दुचाकीस्वारांमध्ये मानेच्या समस्या तीनचार पटीने अधिक प्रमाणात दिसून येतात. पाठ, कंबर आणि मानेच्‍या समस्यांवर सुरुवातीला व्यायाम आणि फिजिओथेरपी असेच उपचार केले जातात. यासह एमआरआय किंवा एक्सरे काढून पुढील उपचार ठरवले जातात. तसेच इंजेक्शन देऊनही ही समस्या तात्पुरती बरी करता येऊ शकते, असे डॉ. ओम पाटील यांनी सांगितले.

मायक्रोट्रॉमाची शक्‍यता
ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. ओंकार सदिगळे यांनी सांगितले, की लहान-मोठे खड्डे आणि खराब रस्त्यांवरून प्रवास करताना सूक्ष्म आघात आणि मायक्रोट्रॉमा होऊ शकतो, ज्यामध्ये मणक्याचे (मान आणि पाठ) जास्तीत जास्त नुकसान होते. मायक्रोट्रॉमा (लचक भरणे, मायक्रोफ्रॅक्चर आणि डिस्कशी संबंधित समस्या) बऱ्याचदा उपचार न केल्याने दीर्घकाळ परिणाम होतात. आमच्याकडे अनेक तरुण रुग्ण उपचारांकरिता येतात. सुरुवातीला दुर्लक्ष केल्याने तसेच दीर्घ प्रवासानंतर पाठदुखीचा अनुभव येतो. हे रुग्ण सामान्यतः २० ते ४० वयोगटातील आहेत, ज्यांनी जवळपास सर्वच औषधे कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतली आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93988 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..