शिवडी गणेशोत्सव मंडळ आर्थिक विवंचनेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवडी गणेशोत्सव मंडळ आर्थिक विवंचनेत
शिवडी गणेशोत्सव मंडळ आर्थिक विवंचनेत

शिवडी गणेशोत्सव मंडळ आर्थिक विवंचनेत

sakal_logo
By

शिवडी, ता. २२ (बातमीदार) ः कोरोनानंतर निर्बंधमुक्त सण साजरे केले जात असले, तरी वर्गणीदारांनी यंदा हात आखडता घेतला आहे. दरवर्षी देखाव्यातून समाज प्रबोधन करणाऱ्या मुंबई येथील शिवडीचा महाराजा मंडळाने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे आर्थिक गणित विस्कटल्याने देणगी आणि वर्गणीवर परिणाम झाला होता.
शिवडीचा राजा गणेशोत्सव मंडळाचे यंदा ७१ वे वर्ष असल्याने हे मंडळ अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करतेय. हे मंडळ दरवर्षी देखाव्यातून नागरिकांना संदेश देत असते. गेल्या दोन वर्षांच्या कोविडमुळे उद्योग, व्यवसायात मंदी आली आहे. गणेशोत्सव मंडळांना याचा फटका बसतो आहे. जाहिरात, वर्गणी आणि देणगी नसल्याने या वेळी सामाजिक देखावा असणार नाही; मात्र गणेशोत्सव त्याच जल्लोषात साजरा करणार आहोत, असे मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक विजय इंदुलकर यांनी सांगितले. यंदा देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा देखावा व शिवडी गणेशोत्सव मंडळाची २२ फुटांची मूर्ती हे या मंडळाचे विशेष आहे. कापड आणि रंगाच्या साह्याने तो सादर केला जाईल. त्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93994 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..