गरजुंना झटणारे श्री साईबाबा मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरजुंना झटणारे श्री साईबाबा मंदिर
गरजुंना झटणारे श्री साईबाबा मंदिर

गरजुंना झटणारे श्री साईबाबा मंदिर

sakal_logo
By

वसई पश्चिम नवयुग नगर येथे साईबाबा मंदिर आहे. शिवछाया मित्र मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून देखभाल केली जात आहे. गोरगरिबांना समाजात सन्मान मिळावा, त्यांना मदत करता यावी याकरिता नेहमीच प्रयत्न केले जात आहेत. वर्षभर सणासुदीला साईंचे दर्शन घेण्यासाठी तालुक्यातून नागरिकांची गर्दी होत असते.
साईबाबा मंदिराची २२ जानेवारी १९८८ साली स्थापना झाली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या हस्ते साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी साईंच्या गजरात नवयुग परिसर दुमदुमला. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. साईचरित्र, वर्धापन दिन, हरिपाठ, पालखी सोहळा यासह भजन, कीर्तनाचे येथे वर्षभर आयोजन केले जाते. वर्षभर या ठिकाणी भाविकांची रेलचेल असते. डिम्पल पब्लिकेशनच्या एकाच वेळी १८ पुस्तकांचे प्रकाशन याठिकाणी करण्यात आले व वाचन चळवळीला ट्रस्टने प्रोत्साहन दिले. याचबरोबर ट्रस्टची रुग्णवाहिका असून, आदिवासी नागरिकांना मोफत सेवा दिली जाते. तसेच त्यांना मोफत धान्य, शैक्षणिक साहित्य पुरवले जात आहे. अनाथाश्रम, लहान मुलांचे आश्रम, वृद्धाश्रम या ठिकाणी भेट देत मंदिराचे स्वयंसेवक मदतीचा हात देत आहेत. तळागाळातील कचरावेचक, सफाई कामगार, निराधार, रिक्षाचालक, मोलमजुरी व घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. अंध, दिव्यांग बांधवांना मदत केली जात आहे. ‘आई’ सन्मान सोहळ्याचे भव्य आयोजन देखील ट्रस्टने केले होते. यावेळी मातांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले; तर रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांना व साईंच्या पादुकांना १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम करण्यात आला होता. पाध्ये यांचा यावेळी सत्कार केला. ३० फुटांचे चलचित्र येथील मंदिरात वर्धापन दिनी पाहावयास मिळते. गेली ३२ वर्षे शिवछाया मित्र मंडळाकडून वसई ते शिर्डी पदयात्रा काढली जात आहे. आरोग्य शिबिरांचे आयोजन देखील वर्षभर केले जाते. साईबाबा मंदिरात धार्मिक उत्सव साजरे केले जातात, यावेळी भक्तांमध्ये नेहमीच आनंदाचे वातावरण असते. याचबरोबर आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेतला जातो, जेणेकरून गरजू घटकांना त्याचा फायदा होईल, अशी माहिती श्री साईबाबा मंदिराच्या शिवछाया मित्र मंडळाचे विश्वस्त संदेश जाधव यांनी दिली.
...
घरोघरी साई संकल्पना
कोरोना काळात मंदिरे बंद होती, त्यामुळे शिर्डीचे नगरसेवक मंगेश त्रिभुवन यांच्या संकल्पनेतून घरोघरी साई संकल्पना राबविण्यात आली. यावेळी दहिसर, अंधेरी, वसई-विरारसह आजूबाजूच्या परिसरात साईबाबांची मूर्ती नेण्यात आली व साईचरित्राचे पठण ५२ भक्तांनी केले. त्यानंतर सामुदायिक सोहळा साजरा करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93999 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..