बोईसरमध्ये विनायक मेटे यांना श्रद्धांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोईसरमध्ये विनायक मेटे यांना श्रद्धांजली
बोईसरमध्ये विनायक मेटे यांना श्रद्धांजली

बोईसरमध्ये विनायक मेटे यांना श्रद्धांजली

sakal_logo
By

मनोर, ता. २२ (बातमीदार) ः शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. बोईसर येथे शिव मावेळे प्रतिष्ठानतर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रविवारी (ता. २१) डॉन बॉस्को स्कूलच्या सभागृहात त्यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. विनायक मेटे यांनी मराठा समूहाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आयुष्य पणाला लावले. नव्या सरकारने मराठा समूहाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करणे हीच मेटे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, अशी भावना या वेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

शोकसभेत संतोष मराठे, संजय ज. पाटील, जितेंद्र राऊळ, जगदीश धोडी, अनंत दळवी, कृष्णा देशमुख, गजानन देशमुख, प्रमोद जाधव, अनिल नायगुडे, प्रताप पाटील, वसंत बुरुडे यांनी मनोगत व्यक्त केले. दिवंगत विनायक मेटे यांच्या जाण्याने मराठा समूहाबरोबरच बहुजन समाजाचेही मोठे नुकसान झाले आहे. तळागाळातील लोकांसाठी झटणाऱ्या अभ्यासू, प्रामाणिक आणि कणखर नेतृत्वाला मराठा समाज मुकला आहे. मराठा समाजाच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तम जाण असणारे आणि आपले प्रखर व धारदार विचार स्पष्टपणे मांडणाऱ्या मेटे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूची चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
शोकसभेच्या सुरुवातीला मेटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून उपस्थित सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. या वेळी डॉ. सुभाष साळुंखे, एस. डी. कदम, उमेश शेट्टी, प्रवीण शेट्टी, विजय बोपर्डीकर, तेजस पवार, सुधीर भांडवलकर, विनोद मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94009 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..