किववरील मासे शेतकऱ्यांसाठी लाभदायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किववरील मासे शेतकऱ्यांसाठी लाभदायक
किववरील मासे शेतकऱ्यांसाठी लाभदायक

किववरील मासे शेतकऱ्यांसाठी लाभदायक

sakal_logo
By

वाडा, ता. २२ (बातमीदार) ः वाडा तालुक्यात नाले व शेतावर किव करून शेतकरी पावसाळ्यात मासेमारी करतात. या मासेमारीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. वाडा, कुडूस, खानिवली, अंबाडी या बाजारपेठेत हे मासे विक्रीसाठी नेले जातात. २०० ते २५० रुपये किलोने बाजारपेठेत हे मासे मिळतात. हे मासे विकत घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली नेहमीच दिसून येते.

वाडा तालुक्यात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. पावसाळ्यात भातशेतीची लागवड केल्यानंतर काही दिवसांनी शेतकरी आपल्या शेतात तसेच नाल्यावर किव करून मासेमारी करतात. पुराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासे मिळतात. त्यानंतर शेतकरी बाजारपेठेत जाऊन मासे विकतात. २०० ते २५० रूपये किलो दराने मासे विक्री केली जाते. वाडा तालुक्यात घोडविंदे पाडा, तानसा फार्म, बोरांडा, पीक, चिंचघर पाडा आदी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासे मिळतात. किववर मासे विकत घेण्यासाठी खवय्ये गर्दी करतात. हातोहात हे मासे संपतात, असे मासेमारी करणारे शेतकरी सांगतात. काही शेतकरी मासे सुकवून ठेवतात. सुकवलेल्या माशांनाही प्रतिकिलो ४०० रुपये भाव आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94011 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..