साकीनाका येथील परेरावाडीच्या इच्छापूर्ती गणेशाचे आगमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साकीनाका येथील परेरावाडीच्या इच्छापूर्ती गणेशाचे आगमन
साकीनाका येथील परेरावाडीच्या इच्छापूर्ती गणेशाचे आगमन

साकीनाका येथील परेरावाडीच्या इच्छापूर्ती गणेशाचे आगमन

sakal_logo
By

चेंबूर, ता. २२ (बातमीदार) ः साकीनाका येथील परेरावाडीच्या इच्छापूर्ती गणेशाचे आगमन मोठ्या जल्लोषात करण्यात आले. परेरावाडी मोहिली व्हिलेज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा ५७ वे वर्ष आहे. या निमित्त गणपती आगमनाचा सोहळा पार पडला. परेरावाडी येथे मूर्ती दाखल होताच मुंबईचे प्रसिद्ध जय जवान गोविंदा पथक यांनी सात थर लावून या बाप्पाला सलामी दिली. त्याचबरोबर ५७ मशाली पेटवून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या राजाचे विभागात स्वागत केले. गेले दोन वर्षे कोरोनामध्ये कोणाकडूनही वर्गणी घेतली नाही आणि उत्सवही नियम पाळून केला. मात्र यंदा मोठ्या उत्साहात हा गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे मंडळाच्या अध्यक्ष प्रकाश सावंत यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94013 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..