ठाणे महापालिका प्रशासनावर नामुष्की | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे महापालिका प्रशासनावर नामुष्की
ठाणे महापालिका प्रशासनावर नामुष्की

ठाणे महापालिका प्रशासनावर नामुष्की

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : महानगरपालिका प्रशासनाकडून नुकत्याच सहायक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या; मात्र या बदल्यांना सहायक आयुक्तांकडून केराची टोपली दाखवण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील त्यांच्यावर कारवाईची तयारी सुरू केली. कळवा वगळता वर्तकनगर आणि वागळे प्रभाग समिती सहायक आयुक्त बदल्यांचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागे घेतले असल्याची बाब उघडकीस आली असून पालिकेच्या वरिष्ठांवर आदेश मागे घेण्याची नामुष्की ओढवल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती.

मागील अनेक वर्षांपासून ठाणे शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. या बांधकामांवरून ठाणे पालिका प्रशासनावर टीकेची झोडदेखील उठवण्यात आली. पालिकेच्या सर्वसाधारण सभेतदेखील या अनधिकृत बांधकामांवरून लोकप्रतिनिधींकडून प्रशासनावर व त्यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करण्यात आली आहे. याची गंभीर दखल घेत, पालिका प्रशासनाने सहायक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या. वर्तकनगर प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांची वागळे प्रभाग समितीत बदली करण्यात आली असून याशिवाय त्यांच्याकडे परवाना विभाग, क्लस्टर सेलचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे; तर कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त समीर जाधव यांची वर्तकनगर प्रभाग समितीत बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे निवडणूक विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. ठाणे महापालिकेत बदली झालेले सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना कळवा प्रभाग समिती देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी कळव्याचा पदभार घेतला होता; तर बदल्यांचे आदेश धुडकावून लावत समीर जाधव आणि सचिन बोरसे हे बदलीच्या ठिकाणी हजर झाले नव्हते. या बदल्या रोखण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. या दोन्ही अधिकाऱ्यांना महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून २४ तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. या मुदतीत समाधानकारक खुलासा प्राप्त झाला नाही, तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता.

पुन्‍हा नव्‍याने आदेश
आता पालिका प्रशासनाने कळवा वगळता वर्तकनगर आणि वागळे प्रभाग समिती सहायक आयुक्त पदांच्या बदल्यांचे आदेश मागे घेतले आहेत. यामुळे कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त समीर जाधव यांची निवडणूक विभागात बदली झाली असून त्यांच्या जागी सुबोध ठाणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे; तर सचिन बोरसे यांच्याकडे वर्तकनगर प्रभाग समितीचा; तर अजय एडके यांच्याकडे वागळे इस्टेट प्रभाग समितीचा पदभार कायम ठेवण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94017 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..