ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड
ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड

ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड

sakal_logo
By

ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड
अर्ध्या तासात दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मध्य रेल्वेच्या भायखळा ते सीएसएमटीदरम्यान अप मार्गावर रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना सोमवारी (ता. २२) सकाळी घडली. त्यामुळे अप जलद मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळित झाली. परिणामी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे हाल झाले. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, भायखळा ते सीएसएमटीदरम्यान जलद अप दिशेच्या ओव्हरहेड वायरमध्ये सोमवारी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांना विद्युत पुरवठा होत नसल्याने एकामागे एक मेल-एक्स्प्रेस आणि लोकल गाड्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे जलद मार्गावरील लोकलच्या वाहतुकीवरदेखील मोठा परिणाम झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल होऊन रेल्वे कर्मचाऱ्यांनी ओव्हरहेड वायरमधील बिघाड दुरुस्त करून अर्ध्या तासात सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरू केली. या घटनेमुळे जलद मार्गावरील लोकलच्या एकामागे एक रांगा लागलेल्या होत्या, यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. कल्याण, डोबिवली आणि ठाण्यावरून सीएसएमटी स्थानकाकडे येणाऱ्या जलद लोकल दुपारी १२ वाजेपर्यंत १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. परिणामी, प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागलेला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94038 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..