राजस्‍थान सरकारच्‍या निषेधार्थ मुंबईत आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजस्‍थान सरकारच्‍या निषेधार्थ मुंबईत आंदोलन
राजस्‍थान सरकारच्‍या निषेधार्थ मुंबईत आंदोलन

राजस्‍थान सरकारच्‍या निषेधार्थ मुंबईत आंदोलन

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ ः राजस्थानमध्‍ये शिक्षकांच्‍या माठातील पाणी प्यायल्याच्या रागाने शिक्षकाने एका दलित विद्यार्थ्याला मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोपीला पाठीशी घालणाऱ्या जातीयवादी सरकारच्या निषेधार्थ देशात ठिकठिकाणी विविध संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. मुंबईतही याचे पडसात उमटले.

चेंबूरमध्ये आरपीआयचे आंदोलन
चेंबूर (बातमीदार) ः आरपीआयच्या वतीने चेंबूर नाक्याजवळ निदर्शने करण्यात आली. राजस्थान राज्यातील जालौर विधानसभा मतदारसंघामधील सुराणा गावात सरस्वती विद्यालयात शिकणारा दलित मुलगा इंद्र कुमारने शिक्षकांच्या माठातील पाणी पायल्याने शिक्षकाने मारहाण केली होती. त्यात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. आरोपीला राजस्थानमधील जातीयवादी सरकार पाठीशी घालत असल्याने या सरकारचा निषेध करण्याकरिता आरपीआयने आंदोलन केले.

भांडुपमध्‍ये पँथर सेना रस्‍त्‍यावर
भांडुप (बातमीदार) ः भांडुप पश्चिम स्टेशन रोड परिसरात ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. आरोपीला फाशी देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. तसेच दलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात कायदे कडक करावेत, अशी मागणी या वेळी केली गेली. या वेळी ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, मुंबई प्रदेश अध्यक्ष संदेश वाघचौरे, कृष्णा दिवेकर, सुषमा शिंदे, मनोज खाडे, स्वप्नील गंगावणे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94043 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..