डोंबिवली येथे मंगळसूत्र चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवली येथे मंगळसूत्र चोरी
डोंबिवली येथे मंगळसूत्र चोरी

डोंबिवली येथे मंगळसूत्र चोरी

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २२ (बातमीदार) ः सकाळी फिरण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि साखळी खेचून दोन चोरांनी पळ काढल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. ही घटना सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याचा शोध सुरू केला आहे.

कल्याण-डोंबिवलीला जोडणाऱ्या ठाकुर्ली समांतर रस्त्यावर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी नागरिकांची गर्दी असते. हीच संधी साखळी चोर साधत आहेत. याच परिसरात राहणारी एक महिला या रस्त्यावर सकाळी मॉर्निंग वॉक करत होती. याच दरम्यान दोन तरुण दुचाकीवर महिलेच्या मागावर होते. यातील एका तरुणाने खाली उतरून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व साखळी हिसकावली व दोन्ही तरुणांनी लगेच दुचाकीवरून पोबारा केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94059 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..