गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन नोंदणी
गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन नोंदणी

गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन नोंदणी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २२ : मुंबई महापालिका क्षेत्रात नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जनस्थळी मोठ्या संख्येने गणेशमूर्ती येतात. या वेळी होणारी गर्दी आणि भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन महापालिकेने विसर्जनासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मूर्तींचे विसर्जन करणे सुरळीतपणे व्हावे या उद्देशानेच ही सुविधा उपलब्ध करून दिली असून, घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्वतंत्र नोंदणी करता येणार आहे.
मुंबई महापालिकेने कृत्रिम तसेच नैसर्गिक विसर्जनस्थळांची प्रभागनिहाय यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. जे विसर्जन स्थळ आपल्या घराच्या किंवा मंडळाच्या नजीक असेल अशा ठिकाणांची निवड गणेशभक्तांना करता येणार आहे. सर्व माहिती भरल्यानंतर विसर्जनासाठी निवडलेले स्थळ, तारीख आणि वेळ याबाबतचा संदेश नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर उपलब्ध होईल. प्रत्येक एक तासाच्या वेळेत १०० गणेशभक्तांना नोंदणी करणे शक्य होणार आहे. त्यासाठी https://shreeganeshvisarjan.com या लिंकवर भाविकांनी नोंदणी करण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94066 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..