शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची डरकाळी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची डरकाळी!
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची डरकाळी!

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची डरकाळी!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २२ : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून राज्यभरात जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. आदित्य ठाकरेंनी राज्यभर सभांचा धडाका लावला असताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही गणेशोत्सवानंतर ‘महाप्रबोधन यात्रा’ काढण्याची घोषणा केली आहे. या यात्रेची सुरुवात ठाण्यातील टेंभी नाका येथून करण्याचा निर्धार आहे.
शिवसेनेचा ठाण्यातील केंद्रबिंदू म्हणून टेंभी नाक्याकडे पहिले जाते. याच भागात शिवसेना जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांचे आनंद आश्रम आणि शिवसेनेचे निवडणूक कार्यालयदेखील आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना साद घालत आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आता याच टेंभी नाक्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही शिंदे यांना प्रतिआव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सवानंतर शिवसेनेकडून राज्यभरात महाप्रबोधन यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेची सुरुवातच ठाण्यातून करण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे. यासाठी होणारी सभा टेंभी नाक्यावर घेण्याचे प्रयत्न आहेत.

शिंदेंना शह देण्याचे प्रयत्न
विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडून शिंदे गट व उद्धव ठाकरे गट पडले. ठाण्यातील सध्याची परिस्थिती पाहता जवळपास ९० टक्के माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आगामी पालिका तसेच राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनीही शिंदे यांना शह देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94070 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..