दुभाजकावरील झोपड्या जमीनदोस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुभाजकावरील झोपड्या जमीनदोस्त
दुभाजकावरील झोपड्या जमीनदोस्त

दुभाजकावरील झोपड्या जमीनदोस्त

sakal_logo
By

खारघर, ता. २३ (बातमीदार) : घरकुलकडून शिव मंदिराकडे जाणाऱ्या नवी मुंबई मेट्रो पुलाखाली असलेल्या भिकाऱ्यांनी रस्त्याच्या दुभाजकावर उभारलेल्या झोपड्या पालिकेने जमीनदोस्त केल्या आहेत. यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहे.
खारघर सेक्टर १२ मधील घरकुलकडून शिवमंदिरकडे जाणाऱ्या मेट्रो पुलाखालील रस्त्याच्या कडेला काही फासेपारधींनी थेट दुभाजकावर झोपडी उभारून कुटुंबासह राहत होते. या झोपड्यांत राहणारे मुले रस्त्यावरच खेळत असायचे. या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असल्यामुळे मुले अथवा महिला वाहनांखाली येऊन अपघाताची शक्यता होती. असे झाल्यास त्याला कोण जबाबदार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. याविषयी खारघरमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पनवेल पालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन खारघर विभाग कार्यालयाने सोमवारी (ता. २२) या झोपड्या जमीनदोस्त केल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94071 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..