गणेशोत्सवापूर्वी प्रवास सुकर होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवापूर्वी प्रवास सुकर होणार
गणेशोत्सवापूर्वी प्रवास सुकर होणार

गणेशोत्सवापूर्वी प्रवास सुकर होणार

sakal_logo
By

कर्जत, ता. २३ (बातमीदार) : तालुक्यातील पोटलपाली, आंबोट, भालिवडी या रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने अक्षरश: चाळण झाल्याचे दृश्‍य होते. येथून प्रवास करणे त्रासदायक, वाहनधारकांसाठी धोकादायक झाले होते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे भरून तो वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली होती. अखेर आमदारांच्या सूचनेनंतर या रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम सुरू झाले आहे.
कर्जत तालुक्यातील राष्ट्रीय मार्ग क्रमांक ७९ वंजारवाडी ते भिवपुरी पॉवर स्टेशन या मार्गाचे काम ९ सप्टेंबर २०१४ मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २ कोटी ७६ लाख १९ हजार रुपये खर्च करून करण्यात आले होते. ग्रामविकास मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रकल्प निधी मंजूर केल्यानंतर मे. मिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीने काम पूर्ण केले. मात्र, देखभाल दुरुस्तीचा कालावधी संपल्यानंतर पोटलपाली, आंबोट व भालिवडी येथील स्थानिक नागरिकांनी पावसाळी रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेता आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेत याबाबत चर्चा केली. तसेच रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरल्यास पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे सोपे होईल, असे सांगितले. तसेच उपविभागीय अभियंता बांधकाम उपविभाग जिल्हा परिषद कर्जत कार्यालय येथे वारंवार चर्चा व निवेदन सादर करून रस्ता प्रवासायोग्य करण्यात यावा, अशी मागणी केली होती. आमदार महेंद्र थोरवे यांच्या आदेशानुसार बांधकाम विभागाने तत्काळ दखल घेत पोटलपाली ते भालिवडी या जिल्हा ग्रामीण मार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे येणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी हा मार्ग प्रवासासाठी सुखकर ठरणार असल्याने स्थानिकांसह प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

नाईलाजाने त्रासदायक प्रवास
अनेक दिवसांपासून कर्जत तालुक्यातील पोटलपाली ते भालवडी या मार्गावरील भालिवडी, आंबोट, पोटल, पाली आणि तीन आदिवासी वाड्यांमधील नागरिकांसह व्यापारी वर्ग, नोकरदार, विद्यार्थी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवास करणे जिकीरीचे झाले होते. मात्र, तरी सुद्धा आपली गरज म्हणून नाईलाजाने या मार्गावरून त्रासदायक प्रवास सहन करावा लागत होता.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94076 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..