मॅरेथॉनमध्ये प्रमिला पाटील, दिनकर महालेची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॅरेथॉनमध्ये प्रमिला पाटील, दिनकर महालेची बाजी
मॅरेथॉनमध्ये प्रमिला पाटील, दिनकर महालेची बाजी

मॅरेथॉनमध्ये प्रमिला पाटील, दिनकर महालेची बाजी

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २३ (बातमीदार) : कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत महिला खुल्या गटात प्रमिला पाटील हिने, तर पुरुष गटात दिनकर महाले याने बाजी मारली. यंदाच्या या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील स्पर्धकांचे वर्चस्व होते.
कोकणातील खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळावे आणि या स्पर्धेतून देशाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेडाळू मिळावेत, यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा ‘एक धाव शिक्षण-आरोग्यासाठी’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या स्पर्धेचे हे सातवे वर्ष होते. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, श्रीनिवास वनगा, मनीषा चौधरी, शांताराम मोरे, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, विक्रमगड नगरपंचायतचे नगरध्यक्ष नीलेश पडवळे, उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे, गणेश कासट आदी उपस्थित होते. या स्पर्धेत आठ हजारहून अधिक स्पर्धकांनी हजेरी लावली होती. या स्पर्धेत महिला गटात दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे मेहक वसावे व उज्ज्वला मुकणे यांनी स्थान पटकावले; तर खुल्या गटात पुरुषाध्येही दुसऱ्या स्थानी दयाराम गायकवाड, तर तिसऱ्या स्थानी विजय मोरघा यांनी बाजी मारली.

स्पर्धेचा निकाल -
१० वर्षे मुली :
प्रथम : गौरी चौधरी, द्वितीय : प्रियांका हडळ, तृतीय : तनुश्री गार्डर
१० वर्षे मुले :
प्रथम : प्रशांत गुजड, द्वितीय : रोनीत पालवा, तृतीय : आयुष चव्हाण
१४ वर्षे मुली :
प्रथम : रोनिका दांडेकर, द्वितीय : भावना फरले, तृतीय : प्रिया दिवा
१४ वर्षे मुले:-
प्रथम : मयूर धोडी, द्वितीय : हेमंत मोराघा, तृतीय : संजय भीमरा
१७ मुली :-
प्रथम : साधना यादव, द्वितीय : आदिती पाटील, तृतीय : रोहिणी दांडेकर
१७ वर्षे मुले :
प्रथम : दीपक रावत, द्वितीय : निकेश डोंगरकर, तृतीय : कबीर गोरवाला
१९ वर्षे मुली :
प्रथम : दिव्या पिंगळे, द्वितीय : कविता दांगटे, तृतीय : निकिता मरले
१९ वर्षे मुले :
प्रथम : रोहन चौधरी, द्वितीय : रोहन वाघ, तृतीय : विकास राजभर

खुला गट महिला :
प्रथम : प्रमिला पाटील, द्वितीय : मेहक वसावे, तृतीय : उज्ज्वला मुकणे
खुला गट पुरुष :
प्रथम : दिनकर महाले, द्वितीय : दयाराम गायकवाड, तृतीय : विजय मोरघा

प्रतिक्रिया-
या वर्षी कोकण वर्षा मॅरेथॉनमध्ये ग्रामीण भागातील स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यामुळे कोकणातील मुलांचाही आत्मविश्वास वाढला असून अधिकाधिक नवे खेळाडू कोकणच्या पुण्यभूमीत तयार होतील.
- नीलेश सांबरे, आयोजक तथा संस्थापक, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94081 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..