रिक्षाचालकांच्या मनमानीचा प्रवाशांवर भार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षाचालकांच्या मनमानीचा प्रवाशांवर भार
रिक्षाचालकांच्या मनमानीचा प्रवाशांवर भार

रिक्षाचालकांच्या मनमानीचा प्रवाशांवर भार

sakal_logo
By

वाशी, ता. २३ (बातमीदार) ः लॉकडाऊनच्या काळात सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमांचे कारण देत रिक्षाचालकांनी केलेली प्रवासी भाडेवाढ लॉकडाऊन संपल्यानंतरही कायम आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील मुकुंद कंपनी ते ऐरोली रेल्वे स्थानक, सेक्टर ४ व ५ कडे शेअर प्रवासासाठी रिक्षाचालकांकडून मनमानी भाडे आकारून प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे.
ऐरोली रेल्वे स्थानक ते मुकुंद या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या मार्गावरील ऐरोली रेल्वे स्थानकातून मुंबई, ठाणे, पनवेलकडे लोकलने तर रिक्षाने ऐरोली नाका, रिलायबल प्लाझा कंपनी, दिघा, मुकुंद कंपनी, विटावा त्याचप्रमाणे चिंचपाडा व यादवनगर येथे प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोरोनाच्या कालावधीत या मार्गावरून दोनच प्रवाशांकडून तीन प्रवाशांचे भाडे घेण्यात येत होते. मात्र कोरोना संपल्यानंतरही रिक्षा चालकांनी चार प्रवासी घेऊन लुटमार सुरूच ठेवली आहे. ऐरोली रेल्वे स्थानकातून दिघा, मुकुंद कंपनी मार्गावरून प्रवास करण्यासाठी पूर्वी १० रुपये घेण्यात येत होते. यात काही महिन्यांपूर्वी पाच रुपयांची भाडेवाढ करत ऐरोली सेक्टर ५ ते मुकुंद कंपनी स्टॉपकरिता २० रुपये आकारण्यात येत आहेत; तर ऐरोली रेल्वे स्थानक ते रिलायबल प्लाझा-दिघा मार्गावर प्रवासी भाडेही १५ रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास किमान पाच रुपयांनी महागला असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

पैसे मोजून धोकादायक प्रवास
या मार्गावर सकाळी दोन ते तीन तास वाहतूक पोलिस तैनात असतात; तरीदेखील रिक्षाचालक चार प्रवासी घेऊन जातात. शिवाय अनेक रिक्षांची अवस्था मोडकळीस आली असून पैसे मोजून धोकादायक प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. तसेच या दोन्ही मार्गांवर ठाण्यातील रिक्षा देखील शेअरींगमध्ये प्रवाशांची ने-आण करत असून आरटीओ व वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे रिक्षाचालकांचा मनमानी कारभार सुरू आहे.

राजकीय नेत्यांचा वरदहस्त
राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना पक्षाच्या बड्या नेत्यांचे फोटो टाकून ऐरोली ते मुकुंद कंपनी मार्गावर विनापरवाना रिक्षा स्टॅण्ड उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी अधिकृत रिक्षा स्टॅण्ड आहेत; परंतु विनापरवाना रिक्षा स्टॅण्डवर राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई होत नाही.

बॉक्स
बेशिस्त रिक्षाचालकांवर आरटीओकडून कारवाई करण्यात येते. रिक्षाचालकांनी मनमानी भाडेवाढ केली असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल.
- हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94087 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..