घणसोलीत माणुसकीवर दुर्गंधी भारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घणसोलीत माणुसकीवर दुर्गंधी भारी
घणसोलीत माणुसकीवर दुर्गंधी भारी

घणसोलीत माणुसकीवर दुर्गंधी भारी

sakal_logo
By

कोपरखैरणे, ता. २३ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेने निराधारांना मदत करण्याच्या उद्देशाने ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागतही झाले; पण या उपक्रमाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे मूळ संकल्पनेलाच हरताळ फासला जात आहे. घणसोली, सेक्टर ८ येथील शनी मंदिराच्या शेजारी असणाऱ्या माणुसकीच्या भिंतीमुळे परिसरातील नागरिकांवर नाक बंद करून चालण्याची वेळ आली आहे. कारण, पदपथावरील या भिंतीजवळ भिजलेले जुने कपडे, तुटलेल्या खराब चपला, मुलाची खराब झालेली दफ्तरे, अन्नपदार्थांची पाकिटे, फेकून दिलेला कचरा, पान खाऊन मारलेल्या पिचकाऱ्यांमुळे दुर्गंधी पसरली असून पालिकेच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती ओढावल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94090 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..