पीओपी मूर्तींच्या मागणीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीओपी मूर्तींच्या मागणीत वाढ
पीओपी मूर्तींच्या मागणीत वाढ

पीओपी मूर्तींच्या मागणीत वाढ

sakal_logo
By

वाशी, ता. २३ (बातमीदार) ः दोन वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर राज्य सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)वरील बंदी उठवली आहे. त्यामुळे शाडूच्या मातीपेक्षा पीओपीच्या मूर्तींना मागणी वाढली आहे.
कच्चा माल महागल्यामुळे मूर्तीच्या दरांत वाढ झाली आहे. त्यामुळे शाडूची मूर्ती तुलनेने महाग झाली असून, भाविकांनी पीओपीच्या मूर्तींकडे आपला मोर्चा वळवला आहे. अशातच राज्य सरकारने पीओपीवरील बंदी उशिरा उठविल्यामुळे या मूर्ती बनविण्यावर मर्यादा आल्या आहेत. एकीकडे भाविकांची मागणी असूनही मूर्तीचे प्रमाण कमी असल्याचे चित्र बाजारात आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही पीओपीच्या गणेशमूर्तींना पसंती दिली आहे; पण उंच मूर्ती सध्या मिळणे कठीण असल्याने मंडळेही पीओपी मूर्तीच्या शोधात असल्याचे आहेत. तसेच शाडूच्या मूर्तींपेक्षा पीओपीच्या मूर्तींचे दर कमी असल्याने मागणी वाढल्याचे मूर्तिकार सुनील मोरे यांनी सांगितले.

बॉक्स
कोरोनानंतर पीओपी मूर्तीच्या मागणीत वाढ झाली आहे. आता पीओपी मूर्तीचा तुटवडा असल्याने शाडूच्या मूर्ती घेत आहे. पीओपीवरील निर्बंध उशिरा उठविल्याने ऐनवेळी मूर्ती तयार करणे कठीण झाले आहे.
-सुनील मोरे, मूर्तिकार

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94095 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..