सणासुदीत साथीच्‍या आजारांचे विघ्‍न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सणासुदीत साथीच्‍या आजारांचे विघ्‍न
सणासुदीत साथीच्‍या आजारांचे विघ्‍न

सणासुदीत साथीच्‍या आजारांचे विघ्‍न

sakal_logo
By

कल्याण, ता. २३ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली शहरात कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी बदलत्या हवामानामुळे साथीच्या आजाराने डोके वर काढले असून नागरिक ताप, डोकेदुखी, सर्दी, अंगदुखी, जुलाबाने त्रस्त झाले आहेत. सध्‍यस्‍थितीत पालिकेची दोन रुग्णालये आणि दहाहून अधिक नागरी आरोग्य केंद्रांतून रुग्‍णांना आरोग्‍य सेवा दिली जात आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत १ जून ते ३१ ऑक्टोबर या काळात साथ रोग पसरू नयेत म्हणून पालिकेचे विविध विभाग एकत्र येऊन आपत्कालीन कृती आराखडा बनवतात; मात्र तो केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट होत आहे. १ जून ते ३१ ऑक्टोबर या काळात रस्त्यावर भुर्जीपाव, वडापाव, चायनीज, पाणी-पुरी, बर्फ विक्री, सरबत विक्री या गाड्या बंद होणे आवश्‍‍यक आहे; मात्र पालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी यांच्या आडमुठ्या धोरणामुळे हे पदार्थ उघड्यावरच विक्री होत असल्याचे चित्र शहरात सर्वत्र आहे. शहरात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारतींचे बांधकाम सुरू असून, तेथे पावसाचे पाणी साचून डबके निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता नागरिकांना त्रास होत आहे. वेळेवर कचरा न उचलणे, जेथे रुग्ण सापडतो त्या परिसरात धूर आणि जंतुनाशक फवारणी करणे ही कामे घनकचरा विभाग वेळेवर करत नसल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी इमारतींचे काम सुरू असून तेथे मोठे खड्डे आणि पाणी साठल्याने डास निर्माण होत असल्याने आजूबाजूच्या परिसरात साथीच्या आजाराची रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली आहे.
----
१ जून ते २१ ऑगस्ट या काळात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्‍य विभागामार्फत मिळालेल्या साथीच्या आजाराची रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे-
---
आजार रुग्‍णसंख्‍या
गॅस्ट्रो ५०
कावीळ ३४
टायफाईड १३८
डेंगी १६
लेप्टो ०२
मलेरिया ०७
ताप ५५९३
स्वाईन फ्‍ल्‍यू ६२
---
कोरोना (दिवसभरातील)
रुग्ण संख्या ३४
उपचार घेणारे २३१
एकूण डिस्चार्ज १६६४४०
----
आवाहन
नागरिकांनी उघड्यावरील अन्न खाऊ नये, पाणी उकळून प्यावे, आरोग्याची काळजी घ्यावी, साथीच्या आजाराची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात अथवा पालिका रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94097 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..