शालेय क्रीडा स्पर्धा पूर्ववत सुरू करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय क्रीडा स्पर्धा पूर्ववत सुरू करा
शालेय क्रीडा स्पर्धा पूर्ववत सुरू करा

शालेय क्रीडा स्पर्धा पूर्ववत सुरू करा

sakal_logo
By

कांदिवली, ता. २३ (बातमीदार) ः कोरोना कालावधीत बंद पडलेल्या शालेय क्रीडा स्पर्धा पूर्ववत सुरू करण्याबाबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या वतीने राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि शिक्षण सचिव यांना पत्र पाठवण्यात आल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.
कोविडच्या प्रादुर्भावामुळे २०२०-२१ व २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात येऊ नयेत, असे शासन आदेश देण्यात आले होते. विविध शालेय क्रीडा स्पर्धा होऊ न शकल्याने महाराष्ट्रातील खेळाडूंचे मोठे नुकसान झाले आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा नियमित व पूर्णवेळ सुरू झालेल्या आहेत. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर शालेय क्रीडा स्पर्धा पूर्ववत घेण्याबाबत शासनाकडून आदेश प्राप्त न झाल्यामुळे या वर्षीच्या स्पर्धा सुरू झालेल्या नाहीत. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य यांनी २८ जून रोजी शालेय शिक्षण सचिव, महाराष्ट्र राज्य यांना सन २०२२-२३ मध्ये शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत पत्र दिले आहे. या पत्रावर निर्णय न झाल्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाला मंजुरी मिळालेली नाही, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दोन वर्षांपासून शालेय खेळाडू, विद्यार्थी विविध स्पर्धांपासून वंचित आहेत. राज्यातील खेळाडूंना राज्य स्तरावर व देश पातळीवर खेळण्याची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामुळे २०२२-२३ मधील शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे.
- सुभाष मोरे, कार्याध्यक्ष, शिक्षक भारती

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94102 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..