ठाण्यात वयोवृद्धाचा शॉक लागून मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात वयोवृद्धाचा शॉक लागून मृत्यु
ठाण्यात वयोवृद्धाचा शॉक लागून मृत्यु

ठाण्यात वयोवृद्धाचा शॉक लागून मृत्यु

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : उपवन येथे महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीमधून बाहेर आलेल्या एका लोखंडी पट्टीचा स्पर्श झाल्याने शॉक लागून कळंबोली येथील भाऊराव नारायण चव्हाण या ६५ वर्षीय वयोवृद्ध ट्रकचालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी समोर आली. मयत चव्हाण हे दुचाकी एका बाजूला करताना हा प्रकार घडला. कळंबोली, कामोठे गावात राहणारे चव्हाण हे ट्रकचालक असून ते ट्रक घेऊन उपवन येथे सकाळीच आले होते. याचदरम्यान ते ट्रक वळवत असताना, ट्रकमधून खाली उतरून समोर असलेले दुचाकी बाजूला करण्यासाठी गेले असता, महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीमधून बाहेर आलेल्या एका लोखंडी पट्टीला त्यांचा स्पर्श झाल्यामुळे त्यांना शॉक लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94110 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..