सत्कारामुळे विद्यार्थ्यांना नवीन बळ मिळते : आशिष शेलार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्कारामुळे विद्यार्थ्यांना नवीन बळ मिळते : आशिष शेलार
सत्कारामुळे विद्यार्थ्यांना नवीन बळ मिळते : आशिष शेलार

सत्कारामुळे विद्यार्थ्यांना नवीन बळ मिळते : आशिष शेलार

sakal_logo
By

मुलुंड, ता. २३ (बातमीदार) ः चांगले गुण मिळाल्यानंतर असा सत्कार झाला तर विद्यार्थ्यांना एक प्रकारचे नवीन बळ मिळते आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळते, असे प्रतिपादन मुंबई भाजप अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी केले. मुलुंड सेवा संघातर्फे दहावी आणि बारावीमध्ये ९० टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, त्‍या वेळी ते बोलत होते.
मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी गुणगौरव समारंभ महाराष्ट्र सेवा संघाच्या सु. ल. गद्रे सभागृहामध्ये पार पडला. या वेळी अनेक मान्यवर मंडळींनी आणि पालकांनी उपस्थिती दर्शवली. सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि एक आकर्षक बक्षीस देऊन या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी आणि मुलुंड सेवा संघ यांच्याद्वारे आयोजित कार्यक्रमात आमदार आशिष शेलार, खासदार मनोज कोटक आणि आमदार मिहिर कोटेचा या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कशा पद्धतीने सज्ज व्हावे यासाठी समुपदेशक कविता रेडकर यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. नेमकी कुठल्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरची संधी उपलब्ध आहे आणि कशा पद्धतीने आपले लक्ष्य गाठण्यासाठी करिअरसाठी वाटा निवडाव्यात यासाठी उपस्थित विद्यार्थ्यांना रेडकर यांनी मार्गदर्शन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गेल्या दोन वर्षांत कोरोना उद्रेकामुळे विद्यार्थ्यांचा सत्कार करता आला नाही, परंतु या वर्षी ही कसर भरून काढत गेल्या दोन वर्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारदेखील या वेळी करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94118 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..