विरारमध्ये राज्य राष्ट्रीय पंच परीक्षा शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरारमध्ये राज्य राष्ट्रीय पंच परीक्षा शिबीर
विरारमध्ये राज्य राष्ट्रीय पंच परीक्षा शिबीर

विरारमध्ये राज्य राष्ट्रीय पंच परीक्षा शिबीर

sakal_logo
By

विरार, ता. २३ (बातमीदार) : महाराष्ट्र आर्म स्पोर्ट्स असोसिएशन या संघटनेतर्फे दुसरी राज्य व राष्ट्रीय पंच परीक्षा व शिबिर पाम बिच रिसॉर्ट विरार येथे उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील १० जिल्हा संघटनांसह ५० हून अधिक लोकांनी या शिबिरात सहभाग घेतला. या वेळी राज्य व राष्ट्रीय पंच परीक्षेला बसलेल्या सर्व पंचांना आर्म स्पोर्ट्समधील आर्म फायटिंग, आर्म पुलिंग आणि आर्म पुशिंग या खेळाचे प्रशिक्षण दिले गेले. लवकरच हा खेळ महाराष्ट्र शालेय गेममध्ये समाविष्ट होणार आहे. या पंच परीक्षेच्या निरोप समारंभात प्रमुख पाहुणे आमदार क्षितिज हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित होती. त्याचबरोबर या खेळासाठी जी काही मदत लागेल ती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तिसरी राज्यस्तरीय स्पर्धा पालघरमध्ये होईल, अशी घोषणा त्यांनी केली. या शिबिरासाठी ‘पालघर जिल्हा आर्म स्पोर्ट्स असोसिएशन’चे अध्यक्ष माणिक दुतोंडे व सचिव विवेक धावडेकर यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94123 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..