बंद झालेली बससेवा पुन्हा सुरू करा : मनसे विद्यार्थी सेनेची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंद झालेली बससेवा पुन्हा सुरू करा : मनसे विद्यार्थी सेनेची मागणी
बंद झालेली बससेवा पुन्हा सुरू करा : मनसे विद्यार्थी सेनेची मागणी

बंद झालेली बससेवा पुन्हा सुरू करा : मनसे विद्यार्थी सेनेची मागणी

sakal_logo
By

मनोर, ता. २३ (बातमीदार) : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लालोंढे गावातील शाळा गाठण्यासाठी पाच ते सहा किलोमीटर अंतराची पायपीठ करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बंद करण्यात आलेली एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने एसटीच्या विभाग नियंत्रकांकडे करण्यात आली आहे. त्यानुसार विभाग नियंत्रकांकडून लवकरच पालघर- खुताडपाडा-नागझरी आणि बोईसर-चिंचारे अशी बससेवा सुरू करण्याचे आश्वासन मनसे पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94132 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..