रोहित्राच्या तेलाने भात पीकाचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोहित्राच्या तेलाने भात पीकाचे नुकसान
रोहित्राच्या तेलाने भात पीकाचे नुकसान

रोहित्राच्या तेलाने भात पीकाचे नुकसान

sakal_logo
By

वाडा, ता. २३ (बातमीदार) : कासघर येथील विद्युत रोहित्र (ट्रान्स्फॉर्मर) गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त अवस्थेत आहे. येथील शेतकरी मिठाराम पाटील यांच्या शेतजमिनीलगत असलेले हे नादुरुस्त रोहित्र हलविण्यात यावे, अशी मागणी अनेकदा त्यांनी वीज वितरण कंपनीकडे केली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर रोहित्रातून गळती होत असलेल्या तेलामुळे पाटील यांची सर्व्हे नं २१ मधील चार एकर शेतजमिनीतील लागवड केलेले भातपीक नष्ट झाले आहे. पाटील हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या संपूर्ण शेत जमिनीतील भातपीक नष्ट झाल्याने ते अडचणीत आले आहेत. त्यामुळे या नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी या शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीकडे व वाडा तहसीलदारांकडे केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94142 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..