बोरमाळची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरमाळची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी
बोरमाळची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी

बोरमाळची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी

sakal_logo
By

कासा, ता. २३ (बातमीदार) ः तलासरी तालुक्यातील बोरमाळ भेंडी पाडा येथील एका वृद्धाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कमरेपर्यंतच्या पाण्यातून अंत्ययात्रा नदीच्या पलिकडे न्यावी लागली होती. त्यामुळे दुर्गम भागातील मूलभूस सुविधांचा अभाव पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाला होता. याबाबत दै.‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तेथील प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मंगळवारी (ता.२३) प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बोरमाळ येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या वेळी तहसीलदार श्रीधर गलीपल्ली, गटविकास अधिकारी डॉ. वैभव सापळे, महसूल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक हजर होते.

तलासरी तालुक्यातील बोरमाळ भेंडी पाडा येथील वृध्द मंगू धोडी यांच्यावर कमरेपर्यंतच्या पाण्यातून नदी पार करून अंत्यसंस्कार करावे लागले होते. बोरमाळ भेंडीपाडा हे गाव काळू नदी किनारी आहे. येथून दीड किलोमीटरवर पारसपाडा असून तेथे स्मशानभूमी आहे. पावसाळ्यात हा प्रवास खुप त्रासदायक आहे. पावसाळ्यात गावातील कुणा व्यक्तीचे निधन झाल्यास नदी पार करणे कठीण होऊन बसते. पण, प्रशासनाचे याकडे इतक्या वर्षांपासून दुर्लक्ष आहे. दरम्यान, आज सकाळी मी स्वतः गटविकास अधिकारी व महसूल कर्मचारी वर्गासोबत त्या गावी पोहचून परिस्थितीची पाहणी केली. गट विकास अधीकारी यांना तेथील पाहणी करून अहवाल मागितला आहे. त्यानुसार लवकरच त्या नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील, असे तहसीलदार श्रीधर गलीपल्ली यांनी म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94149 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..