कासा-वाणगाव बससेवेची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासा-वाणगाव बससेवेची मागणी
कासा-वाणगाव बससेवेची मागणी

कासा-वाणगाव बससेवेची मागणी

sakal_logo
By

कासा, ता. २३(बातमीदार) ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण, तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी तालुक्याला जावे लागते. आर्थिक परिस्थिती खराब असल्याने खर्च परवडत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडतात. त्यामुळ कासा ते वाणगाव बससेवा सुरू करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.


सारणी, उर्से, ऐना दाभोण, निकना, पिंपलशेत या भागातील अनेक विद्यार्थी दररोज वाणगाव येथे असलेल्या शाळा, कॉलेज, आयटीआय, कृषी कॉलेजमध्ये जातात. या परिसरातून जाण्यासाठी कोणतीही बस सेवा नाही. म्हणून प्रवासी खासगी वाहने किंवा दुचाकीवर तीन चार जण बसून प्रवास करत असतात. प्रवासी वाहनात देखील मोठ्या संख्येने प्रवासी बसत असल्याने धोकादायक प्रवास सुरु असतो.
कासा - वाणगाव हा २५ किलोमीटर अंतराचा प्रवास असून मध्ये साखरा धरण आहे. तेथील रस्त्यावर मोठी वळणे असून अनेक घोकादायक मोऱ्या देखील आहेत. घनदाट झाडी असल्यामुळे येथे नेहमीच अपघात होतात. दोन दिवसांपूर्वी याच धरणाच्या वळणावर बस आणि ट्रक यांची टक्कर झाली होती. यात १५ प्रवासी जखमी झाले होते. दरम्यान, कासा -वाणगाव बस सूरु करण्यासाठी आम्ही पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व सर्व सदस्य यांनी ठराव घेऊन एसटी मंडळाकडे पाठवला आहे. अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी या परिसरातून शिक्षणासाठी प्रवास करीत आहेत. त्यांची गैर सोय दूर झाली पाहिजे, असे डहाणू पंचायत समितीचे उप सभापती पिंटू गहला यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94150 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..