अखिल महिला सशक्तीकरण ट्रस्टच्या वतीने तीज महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखिल महिला सशक्तीकरण ट्रस्टच्या वतीने तीज महोत्सव
अखिल महिला सशक्तीकरण ट्रस्टच्या वतीने तीज महोत्सव

अखिल महिला सशक्तीकरण ट्रस्टच्या वतीने तीज महोत्सव

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २३ (बातमीदार) ः भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि बळकटीकरणाच्या उद्देशाने अखिल महिला सशक्तीकरण ट्रस्टच्या वतीने पवई येथील हॉटेल मिनी पंजाब लेकसाईड येथे भव्य तीज उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई व उपनगरमधून महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून या उत्सवात सहभागी झाले होते. या वेळी सांस्कृतिक गाण्यावर महिलांनी नृत्य सादर केले. या तीज महोत्सवात महिलांनी देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाचा तिरंगा फडकावल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात केली. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने तरी महिला आपल्या मैत्रिणींसोबत संवाद करू शकतात, खेळ खेळू शकतात, ज्यामुळे मनावरचे ताण कमी व्हायला मदत होते, असे ट्रस्टच्या मुख्य सल्लागार गीता सिंग म्हणाल्या. या कार्यक्रमाला ट्रस्टच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा ठाकूर, मुंबई अध्यक्षा नीलम ठाकूर उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94158 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..