शिवसेनेचे माजी आमदार शिंदे गटात सामील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचे माजी आमदार शिंदे गटात सामील
शिवसेनेचे माजी आमदार शिंदे गटात सामील

शिवसेनेचे माजी आमदार शिंदे गटात सामील

sakal_logo
By

भांडुप, ता. २३ (बातमीदार) ः शिवसेनेत झालेल्या बंडानंतर शिवसेनेतून सुरू असलेली गळती काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. भांडुपमधील शिवसेनेचे माजी आमदार अशोक पाटील यांनी काही पदाधिकाऱ्यांसोबत एकनाथ शिंदे गटाची वाट धरली आहे. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेनंतर अशोक पाटील हे नाराज असल्याची चर्चा भांडुपमध्ये सुरू होती. भांडुपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून अखेर शिंदे गटाची वाट धरत असल्याचे अशोक पाटील यांनी सांगितले. शिंदे गटात सामील होणाऱ्यांचे हात-पाय तोडू, असा इशारा जेव्हा शिवसैनिकांनी दिला त्यावेळी व्यथित होऊन आपण हा निर्णय घेतल्याचे अशोक पाटील यांनी म्हटले. तसेच जर कुणी आमचे हात-पाय तोडणार असतील, तर त्यांनी तारीख आणि वेळ सांगावी, असेही अशोक पाटील यांनी सांगितले आहे. शेकडो कार्यकर्त्यांसह अशोक पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या गटात प्रवेश करणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94159 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..