सणासुदीत कोरानाचे विघ्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सणासुदीत कोरानाचे विघ्न
सणासुदीत कोरानाचे विघ्न

सणासुदीत कोरानाचे विघ्न

sakal_logo
By

वसई, ता. २३ (बातमीदार) : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण या सणासुदीच्या काळात कोरोनाचे विघ्न निर्माण झाले आहे. कारण वसई विरार शहरात गेल्या पंधरा दिवसांत ४०० हून अधिक कोरोना बाधित आढळून आले आहेत. दिलासा म्हणजे यात एकही मृत्यू झाला नसला तरी गणोशोत्सव काळात नागरिकांनी काळजी घ्यावी, गर्दीपासून दूर राहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
वसई विरार शहराची लोकसंख्या २५ लाख इतकी आहे. दाटीवाटीच्या वस्ती असून, औद्योगिक वसाहत देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बाहेरुन कामगार वर्गाची येजा असते. अशातच गेल्या पंधरा दिवसांची आकडेवारी पाहता कोरोना अद्याप हद्दपार झाला नाही असे दिसते. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे. कारण वसई-विरारमध्ये गेल्या पंधरा दिवसांत ४२८ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
गणेशोत्सव नजीक आल्याने नागरिक विविध प्रकारचे साहित्य खरेदीला जात आहेत. परिणामी बाजारपेठांमध्ये गर्दी आहे. पण दुकानात किंवा गर्दीच्या ठिकाणी सॅनिटाईझर उपलब्ध नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जर गर्दीचे प्रमाण वाढले तर कोरोना पुन्हा डोकेवर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले.

-----------------------------
तारीख - कोरोना रुग्ण
८ - १६
९ - २९
१० - ३३
११ - २७
१२ - ४२
१३ - २६
१४ - ३१
१५ - २२
१६ - २९
१७ - ३३
१८ - २६
१९ - ३७
२० - ३५
२१ - २१
२२ - ११
एकूण - ४२८
-------------------------------
कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आतापर्यंत वसई विरार शहरात एकूण १ लाख ६०३ नागरिक बाधीत झाले तर यापैकी ९८,२९८ बरे झाले व एकूण २,०९१ जणांचा मृत्यू झाला.
------------------------------
लसीकरण मोहीम प्रभावी
कोरोनाबाधित शहरात आढळत असले तरी मृत्यू दर शून्य टक्क्यावर आला आहे. तसेच उपचारानंतर अनेक रुग्ण बरे होत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने नऊ प्रभागात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवली आहे. त्याचबरोबर लसीकरण करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, म्हणून जनजागृती देखील केली जात आहे.
-----------------------------
गर्दी टाळा, संसर्ग पळवा
सणासुदीचे दिवस असल्याने सार्वजनिक ठिकाणी बाजारहाट, दुकानात गर्दी होणार आहे त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी गर्दीत फिरू नये, सुरक्षित अंतर बाळगावे, घरी गेल्यावर हात स्वच्छ धुवावे असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94162 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..