बेस्ट ३३० ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेस्ट ३३० ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार
बेस्ट ३३० ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार

बेस्ट ३३० ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार

sakal_logo
By

किरण कारंडे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : शहरात येत्या काळात वाढत्या विजेच्या मागणीबरोबरच इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येतही भर पडणार आहे. ही वाढती इलेक्ट्रिक वाहनांची संख्या लक्षात घेऊनच बेस्ट उपक्रमाने चार्जिंग स्टेशनच्या संख्येत वाढ करण्याचा रोड मॅप आखला आहे. बेस्ट विद्युत पुरवठा उपक्रमाच्या वीज वितरण क्षेत्रात प्रत्येक तीन किलोमीटरला इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन बेस्ट उपक्रमाने केले आहे. मुंबई शहर तसेच उपनगरात हे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात येणार आहे.

बेस्टच्या मुंबई शहरातील वीज वितरण क्षेत्रात १६ लाख वीज ग्राहकांना बेस्ट उपक्रम वीजपुरवठा करते. या वीज ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल वापरणाऱ्यांचा टक्का आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळेच प्रत्येक तीन किलोमीटरवर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. मुंबईत एकूण ३३० इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. येत्या महिन्यात हे स्टेशन उभारण्याच्या अनुषंगाने काम सुरू होणार आहे. हे चार्जिंग स्टेशन उभे करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

अदाणी, टाटा पॉवरकडून विजेचा पुरवठा
मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या २७ डेपोमध्ये सध्या इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या ठिकाणी खासगी वाहनांसाठीही चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. बेस्टच्या माध्यमातून मुंबई शहरात प्रत्येक तीन किलोमीटर चार्जिंग स्टेशनची सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी डेपोसह बेस्टच्या जागांचाही वापर करण्यात येईल. मुंबई शहरात बेस्ट; तर उपनगरात अदाणी, टाटा पॉवरकडून या चार्जिंग स्टेशनला विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे.
महसूल निर्मितीही करणे शक्य
चार्जिंग स्टेशनचे वीज देयक, इन्फ्रास्ट्रक्चर उभारणी यासाठी टर्न की तत्त्वावर जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही कंत्राटदाराकडे असणार आहे. त्या ठिकाणी कॕफेटेरिया, ग्राहकांना बसण्याची व्यवस्था यासारख्या सुविधा देऊन महसूल निर्मितीही करणे शक्य असेल.
---
कोट
वीज ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल वापरणाऱ्यांचा टक्का आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळेच प्रत्येक तीन किलोमीटरवर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्याचा आमचा मानस आहे.
- लोकेश चंद्र, महाव्यवस्थापक, बेस्ट

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94171 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..